अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील स्वयंसहाय्यता बचत गटांनी मिनी ट्रॅक्टरसाठी 9 फेब्रुवारी पर्यंत प्रस्ताव सादर करावेत : सहायक आयुक्त अर्जुन बन्ने

अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील स्वयंसहाय्यता बचत गटांनी मिनी ट्रॅक्टरसाठी 9 फेब्रुवारी पर्यंत प्रस्ताव सादर करावेत : सहायक आयुक्त अर्जुन बन्नेअनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील स्वयंसहाय्यता बचत गटांनी मिनी ट्रॅक्टरसाठी 9 फेब्रुवारी पर्यंत प्रस्ताव सादर करावेत :  सहायक आयुक्त अर्जुन बन्ने
सांगली : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने याचा पुरवठा करण्याची योजना सन 2012-13 या आर्थिक वर्षामध्ये सुरु केली आहे. या योजनेंतर्गत चालू आर्थिक वर्षासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता इच्छुक बचत गटांनी दिनांक 9 फेब्रुवारी 2021  पर्यंत आवश्यक कागदपत्रासह सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सांगली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगांव रोड, सांगली येथे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त अर्जुन बन्ने यांनी केले आहे.
या योजनेचे निकष पुढीलप्रमाणे - अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत. स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती  घटकातील असावेत. स्वयंसहायता बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत.
प्रस्ताव सादर करण्याकरीता आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे - स्वयंसहाय्यता बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र (महिला आर्थिक विकास महामंडळ, तालुका कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी पंचायत समिती इ.), स्वयंसहाय्यता बचत गटाच्या नावे असलेल्या बँक पासबुकच्या पहिल्या व शेवटच्या पानाची झेरॉक्स, स्वयंसहाय्यता बचत गटाचा ठराव, स्वयंसहाय्यता बचत गटातील सर्व सदस्यांचा सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेला जातीचा दाखला व रहिवासी पुरावा, स्वयंसहाय्यता बचत गटातील सर्व सभासदांचे आधार कार्ड, 100 रूपये स्टँम्पवर ट्रॅक्टर खरेदीबाबतचे हमीपत्र, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स व बँक खातेशी अध्यक्ष व सचिव यांचे आधार लिंक पुरावा, सर्व कागदपत्रो ही साक्षांकित केलेली असावीत. अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगांव रोड, सांगली येथे संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. बन्ने यांनी केले आहे.


Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेसPost a comment

0 Comments