काँग्रेसच्या “या” ज्येष्ठ नेत्याचे निधन ; काँग्रेस नेते राहुल गांधीसह मोदींनीही केला शोक व्यक्त
काँग्रेसच्या “या” ज्येष्ठ  नेत्याचे निधन ; काँग्रेस नेते राहुल गांधीसह मोदींनीही केला शोक व्यक्त


नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सरदार बुटा सिंग यांचे आज शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले. बुटा सिंग गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. ते 86 वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.  ते 1978 ते 1980 या काळात काँग्रेसचे महासचिव होते. यानंतर ते भारताचे गृहमंत्री झाले. मात्र, डॉ. मनमोहन सिंग यांचं सरकार येताच त्यांना बिहारचे राज्यपाल करण्यात आले होते. बुटा सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री, कृषी मंत्री, रेल्वे मंत्री, क्रीडा मंत्री आदी पदे भूषवितानाच बिहारचे राज्यपाल आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्षपदही सांभाळले होते. बुटा सिंग यांच्या निधनावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. सरदार बुटा सिंग यांच्या निधनाने प्रामाणिक जनसेवक आणि निष्ठावान काँग्रेसी नेता गमावला आहे. देश आणि जनतेच्या सेवेसाठी त्यानी संपूर्ण जीवन आर्पित केलं होतं. त्यांचं हे योगदान कायम स्मरणात राहिल, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे.


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सरदार बुटा सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनाचं वृत्त ऐकून दु:ख वाटलं. बुटा सिंग हे अनुभवी प्रशासक होते. दलित आणि गरीबांचा आवाज होते. बुटा सिंग यांच्या कुटुंबाच्या प्रती माझ्या संवेदना आहेत, असं मोदी यांनी त्यांच्या शोकसंदेशात म्हटलं आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

 Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad