अभिनेत्री कंगना रानौतला जोरदार झटका ; कंगनाची याचिका न्यायालयाने फेटाळली

अभिनेत्री कंगना रानौतला जोरदार झटका ; कंगनाची याचिका न्यायालयाने फेटाळली

 अभिनेत्री कंगना रानौतला जोरदार झटका ; कंगनाची याचिका न्यायालयाने फेटाळलीमुंबई : अभिनेत्री कंगना रानौत हिला न्यायालयाने जोरदार झटका दिला असून सदनिकांचे अनधिकृत बांधकाम थांबविण्यासाठीची कंगनाची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, कंगनाने नियमांचे उल्लंघन करत तीन फ्लॅट एकत्र केले आहे.उपनगर दिंडोशी येथील खटल्याची सुनावणीच्यावेळी न्यायाधीश एल. एस.चव्हाण यांनी आदेशात म्हटले आहे की, “खार परिसरातील 16 मजली इमारतीच्या पाचव्या मजल्यावर कंगना रनौत हिने आपले तीन फ्लॅट एकत्रित करताना नियोजित आराखड्यातील बांधकाम काढले आहे. त्यामुळे अन्य क्षेत्रही त्यात समाविष्ट केले. हे मंजूर योजनेचे गंभीर उल्लंघन आहे, ज्यास सक्षम प्राधिकरणाची मंजुरी आवश्यक आहे.' त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेला अनधिकृत बांधकाम पाडण्यापासून रोखण्यासाठी केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाच्या या आदेशामुळे अभिनेत्री कंगना रनौत हिला मोठा झटका बसला आहे. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments