“त्यांचं दुकान बंद होऊ नये म्हणून ते टीका करत असतात” : राज्याच्या गृहमंत्र्यांचा फडणवीस यांना टोला

“त्यांचं दुकान बंद होऊ नये म्हणून ते टीका करत असतात” : राज्याच्या गृहमंत्र्यांचा फडणवीस यांना टोला
 “त्यांचं दुकान बंद होऊ नये म्हणून ते टीका करत असतात” : राज्याच्या गृहमंत्र्यांचा फडणवीस यांना टोला पुणे : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे चांगलं काम केलं तरी टीकाच करणार आहेत. त्यांचं दुकान बंद होऊ नये म्हणून ते टीका करत असतात असा टोला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लगावला आहे. अनिल देशमुख यांनी नववर्षाच्या निमित्ताने पुण्यातील येरवडा कारागृहाला भेट दिली. यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.येरवडा कारागृहबाबत काही मागण्या होत्या. त्याबाबतचं निवेदन यावेळी अनिल देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आलं. “कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त संख्या असून आपल्याला मॉडर्न कारागृह करायचं आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे कारागृहाची क्षमता वाढवण्यासाठी प्रस्ताव दिला आहे,” अशी माहिती यावेळी अनिल देशमुख यांनी दिली.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments