भाजपला मोठा धक्का ; भाजपच्या आणखी एका नगरसेवकाचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

भाजपला मोठा धक्का ; भाजपच्या आणखी एका नगरसेवकाचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
 भाजपला मोठा धक्का ; भाजपच्या आणखी एका नगरसेवकाचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश


नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला चांगलीच गळती लागली आहे. भाजपच्या आणखी एका नगरसेवकाने पक्षाला रामराम ठोकून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. 


भाजप नगरसेविका तनुजा मढवी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला आहे. तनुजा मढवी यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.


उच्च शिक्षित नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. त्यानंतर आज पुन्हा एकदा भाजप नगरसेविकेनं भाजपला रामराम ठोकला. आतापर्यंत 14 नगरसेवकांनी  भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.


विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी भाजपचे 3 नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले होते.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत या तिन्ही नगरसेवकांनी शिवबंधन बांधले होते.  नवीन गवते, अपर्णा गवते, दिपा गवते यांनी सेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेनं धक्का दिल्यानंतर आता राष्ट्रवादीने भाजपला धक्के पे धक्का दिला आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


Post a comment

0 Comments