“जो पर्यंत ते मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत महाराष्ट्रातून कोरोना जाणार नाही” : निलेश राणे

“जो पर्यंत ते मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत महाराष्ट्रातून कोरोना जाणार नाही” : निलेश राणे

 “जो पर्यंत ते मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत महाराष्ट्रातून कोरोना जाणार नाही” : निलेश राणे

मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोनावरून आता भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनीही राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 
निलेश राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, जगामध्ये उद्धव ठाकरेंसारखा विद्वान माणूस नसेल. जो पर्यंत ते मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत महाराष्ट्रातून कोरोना जाणार नाही आणि ते कोरोना जाऊ देणार नाहीत. कुठल्या राज्यात कोरोना इतक्या झपाट्याने पसरत नाही, फक्त महाराष्ट्रात पसरतो कारण मुख्यमंत्र्यांनाच घरीच बसायला आवडतं, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.
निलेश राणे म्हणाले की, राज्यात १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या, महाराष्ट्रात आंदोलने झाली तेव्हा कोरोनाची आकडेवारी वाढली नाही. मात्र अधिवेशनाच्या तोंडावर कोरोना वाढला? लॉकडाऊनच्या संकटात लोकांच्या नोकऱ्या, बँकेचे हफ्ते, लाईटबील घेऊनसुद्धा ठाकरे सरकारला अधिवेशनाला जायचं नाही म्हणून महाराष्ट्रात परत लॉकडाऊन होतोय.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

Post a comment

0 Comments