भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांना कोरोनाची लागण

भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांना कोरोनाची लागण

 जळगाव : भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. रक्षा खडसे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली आहे. खासदार रक्षा खडसे यांची बुधवारी रात्री प्रकृती बिघडली होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी कोरोनाची चाचणी करून घेतली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
 आपल्याला कोरोनाची लागण झाली असून, आपली प्रकृती स्थिर आहे. वैद्यकीय सल्ल्यानुसार आपण उपचार घेत असून, माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोनाची चाचणी करून घ्यावी, आपली काळजी घ्यावी, असे आवाहन रक्षा खडसे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून केले आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
Post a comment

0 Comments