‘खडसेंना जो कोरोना होतो त्यावर संशोधन व्हायला हवे’ : ‘या’ भाजप नेत्याने केली मागणी

‘खडसेंना जो कोरोना होतो त्यावर संशोधन व्हायला हवे’ : ‘या’ भाजप नेत्याने केली मागणी

 ‘खडसेंना जो कोरोना होतो त्यावर संशोधन व्हायला हवे’ : ‘या’ भाजप नेत्याने केली मागणी 


जळगाव : जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीत केंद्र सरकारच्या अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत भूमिगत साठवण टाकी आणि पंपिंग हाऊसचा लोकार्पण सोहळा माजी मंत्री व भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते आज झाला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना तिसऱ्यांदा झालेल्या कोरोनाबद्दल आश्चर्य व्यक्त करीत या कोरोनाच्या संशोधनाची मागणी केली.
एकनाथ खडसे यांना दोन महिन्यात तिसऱ्यांदा कोरोना झाल्याने त्यांची काळजी वाटत आहे. हा असा कोणता कोरोना आहे? जो इतक्या कमी वेळात तीन वेळा होतो. कोरोना एकदा झाला की तो लवकर होत नाही, असे सांगितले जाते. म्हणूनच आम्हाला काळजी आहे. खडसेंना जो कोरोना होतो त्यावर संशोधन व्हायला हवे, अशी तीरकस मागणीच महाजन यांनी केली.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या एका बैठकीत आमच्या जिल्ह्याची अधिक काळजी घेण्याची मागणी केल्याचेही गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले. हा कोरोनाचा नेमका कोणता प्रकार आहे, यासाठी शास्त्रज्ञांना सांगून संशोधन करायला सांगा. त्याचा नायनाट करून तो पुन्हा होणार नाही यांची दक्षता घ्या अशी मागणीही केल्याचे महाजन यांनी पुढे नमूद केले.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


Post a comment

0 Comments