“मोठ्या अभिनेत्याबद्दल बोललं की दिवसभर प्रसिद्धी मिळते” : भाजपा नेत्यांची नाना पटोले यांच्यावर टीका

“मोठ्या अभिनेत्याबद्दल बोललं की दिवसभर प्रसिद्धी मिळते” : भाजपा नेत्यांची नाना पटोले यांच्यावर टीका
मुंबई : भविष्यात काँग्रेस सेलिब्रिटिंच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही, असे नाना पटोले म्हणाले. यानंतर आता भाजप नेते राम कदम यांनी नाना पटोलेंवर निशाणा साधला आहे.


“राज्यातील काँग्रेस पक्षाचे नेते बॉलिवूडमधील अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार यांना धमकी देत आहेत. काँग्रेस पक्षाला झालेय तरी काय? असे असले तरी देशाचे बाजूने जो कोणी बोलेल, त्यांच्यासोबत संपूर्ण देश उभा आहे,” असे राम कदम म्हणाले.तर,विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. विनाअनुदानित शिक्षकांसंदर्भातील आमच्या सरकारचा निर्णय ठाकरे सरकारनं थांबवल्यानं शिक्षकांवर आंदोलन करण्याची वेळ आल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. मोठ्या अभिनेत्याबद्दल बोललं की दिवसभर प्रसिद्धी मिळते, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी नाना पटोलेंना लगावला आहे.  


नाना पटोलेंचं अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या संदर्भातली विधान म्हणजे केवळ प्रसिद्धीसाठी आहे. एखाद्या मोठ्या अभिनेत्याबद्दल बोललं की दिवसभर प्रसिद्धी मिळते. म्हणजे बदनाम हुआ तो क्या हुआ नाम तो हुआ, असा टोला, देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोलेंना लगावला.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
Post a comment

0 Comments