Breaking : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अरुण राठोड पोलिसांच्या ताब्यात

Breaking : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अरुण राठोड पोलिसांच्या ताब्यात

 पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा गुंता सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत पूजाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात महत्त्वाचा दुवा असलेला अरुण राठोडला ताब्यात घेतलं आहे. आता या प्रकरणात अरुण राठोडची थेट पोलीस आयुक्तालयात चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तरी पूजा चव्हाण आत्महत्येचा गुंता सुटणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. चौकशी अहवालात अरुण राठोडचा महत्वाचा भाग आहे. अरुण राठोडच्या नावाने व्हायरल रेकॉर्डिंगचा अहवालात उल्लेख आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
Post a Comment

0 Comments