COVID-19 : या जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची शक्यता ; अजित पवारमुंबई : 1 फेब्रुवारीपासून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढायला लागली आहे. बरे होणाऱ्यांपेक्षा नवे रुग्ण जास्त येऊ लागले आहेत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. गेल्या 9 दिवसांत राज्यात 32,451 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.


"मुंबईपेक्षा जास्त पॉझिटिव्ह अमरावतीत आहेत. मी आधीच म्हटलं होतं की कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ देऊ नका. गोष्टी गांभिर्याने घ्या. कोरोना कमी झालाय, आता पूर्वीसारखं वागायला हरकत नाही असं अनेकांना वाटलं. त्यामुळे परिस्थिती गंभीर झाली," असं अजित पवार म्हणाले.
"प्रसार वाढू नये म्हणून जी खबरदारी घ्यायची असेल ती राज्य सरकार घेईल. अधिवेशनाबद्दल आजच कामकाज समितीची बैठक आहे. त्यात अधिवेशनाबद्दल विचार करू," अमरावती, यवतमाळ, अकोल्यात लॉकडाऊन लावण्याचा विचार, सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. फक्त 3 शहरांमध्ये लावायचा की तिन्ही जिल्हे लॉकडाऊन करायचे हे ठरवू. 12.30 वाजता मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आहे. त्यात निर्णय घेऊ, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured