थोर समाज सुधारक संत गाडगेबाबा महाराज यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे अभिवादन

थोर समाज सुधारक संत गाडगेबाबा महाराज यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे अभिवादन

 
थोर समाज सुधारक संत गाडगेबाबा महाराज यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे अभिवादन 

मुंबई : थोर समाज सुधारक संत गाडगेबाबा महाराज यांना जंयती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा शासकीय निवासस्थानी संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. ‘संत गाडगेबाबा यांची दशसुत्री आमच्यासाठी समाज कार्याची प्रेरणा आहे,’ असेही मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात नमूद केले आहे.

  


मुख्यमंत्री अभिवादन संदेशात म्हणतात, ‘संत गाडगेबाबा यांनी संपूर्ण आयुष्य समाज शिक्षणासाठी वेचले. त्यांनी वाईट रूढी-प्रथांना झटकून टाका असे सांगतानाच, माणसाच्या मुलभूत गरजांसह शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण अशा गोष्टींबाबत देखील परखड भाष्य केले आहे. त्यासाठी समाजाला दशसुत्रीही दिली आहे.  ही दशसुत्री समाजाला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी मार्गदर्शक अशीच आहे. संत गाडगेबाबा यांचे जीवन मोठा अभ्यासाचा विषय आहे. त्यातून नव्या पिढीलाही खूप काही शिकता येईल. आमच्यासाठीही संत गाडगेबाबा यांची दशसुत्रीच समाज कार्याची प्रेरणा आहे. या दशसुत्रीला प्रमाण मानूनच आमची वाटचाल सुरु आहे. संत गाडगेबाबा महाराज यांना विनम्र अभिवादन.’

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

Post a comment

0 Comments