पोहरादेवी गडावरील गर्दीबाबत नियम न पाळणाऱ्या संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश

पोहरादेवी गडावरील गर्दीबाबत नियम न पाळणाऱ्या संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश

 पोहरादेवी गडावरील गर्दीबाबत नियम न पाळणाऱ्या संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश मुंबई : शिवसेना नेते आणि वन मंत्री संजय राठोड पोहरादेवी येथे येणार असल्याने त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात तेथे गर्दी केली होती. तेथे झालेल्या गर्दीवरून सध्या सरकारवर टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे.  
 पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर शिवसेना नेते संजय राठोड यांनी आपली प्रतिक्रिया दिली. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे राठोड यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणात त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं.कोरोनाच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. त्यासोबतच त्यांनी वाशिम जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याचा अहवाल देण्यास सांगण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेसPost a comment

0 Comments