“चित्राताई त्याला ठेचून काढतील, या भितीने नागोबा बाहेर आला ” : भाजपची राठोड यांच्यावर टीका

“चित्राताई त्याला ठेचून काढतील, या भितीने नागोबा बाहेर आला ” : भाजपची राठोड यांच्यावर टीका
 “चित्राताई त्याला ठेचून काढतील, या भितीने नागोबा बाहेर आला ” : भाजपची राठोड यांच्यावर टीकामुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपने आक्रमक भूमिका घेत राठोड यांच्यावर सडकून टीका केली आहे.
बिळातला नाग बाहेर आला, त्या नागोबाला माहित होतं आपण जर बाहेर आलो नाही तर चित्राताई त्याला ठेचून काढतील. या भितीने नागोबा बाहेर आला आहे, अशी खरमरीत टीका भाजप नेते प्रसाद लाड यांनी राठोडांवर केली आहे.
चित्रा ताई वाघ यांनी काल पोलीस महानिरीक्षकांची आणि राज्यपालांची भेट घेतली. आम्हाला कुठल्याही प्रकारे पोलीस निपक्षपातपणे चौकशी करत आहेत असं वाटत नाही, असा आरोप करतानाच या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे देखील लाड यांनी  सांगितले.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेसPost a Comment

0 Comments