महाराष्ट्रात आढळून आलेला स्ट्रेन जास्त घातक ; ‘एम्स’च्या संचालकांचा इशारा
 महाराष्ट्रात आढळून आलेला स्ट्रेन जास्त घातक ; ‘एम्स’च्या संचालकांचा इशारा नवी दिल्ली : देशात २४० नवीन कोरोना स्ट्रेन आढळून आले आहेत. यात महाराष्ट्रात आढळून आलेल्या कोरोनाच्या नवा स्ट्रेनच्या संसर्गाचा वेग प्रचंड असून, तो जास्त घातक ठरू शकतो, असा इशारा दिल्लीतील ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे. अॅण्टीबॉडीज तयार झालेल्या लोकांनाही या नवीन स्ट्रेनचा संसर्ग होऊ शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
 ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी ही माहिती दिली. कोरोनाचे २४० नवे स्ट्रेन देशात आढळून आले असून, महाराष्ट्रात आढळून आलेला स्ट्रेन जास्त घातक ठरू शकतो, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. हर्ड इम्युनिटी ही भारतात कल्पनाच ठरणार आहे. कारण देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के लोकांमध्ये अॅण्टीबॉडीजची गरज आहे. महाराष्ट्रात आढळून आलेल्या नव्या कोरोना स्ट्रेनचा विचार केल्यास हे अवघड दिसत आहे. कारण या स्ट्रेनच्या संसर्गाचा वेग प्रचंड असून, तो जास्त घातक ठरू शकतो. इतकंच काय तर ज्या नागरिकांमध्ये अॅण्टीबॉडीज विकसित झालेल्या आहेत. त्यांनाही याचा संसर्ग होऊ शकतो, असा इशारा डॉ. गुलेरिया यांनी दिला.
कोरोनाच्या उद्रेकाविषयी बोलताना महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनीही महत्त्वाची माहिती दिली. देशभरात कोरोनाचे २४० नवीन स्ट्रेन आढळून आल्यामुळेच कोरोनाच्या संसर्गाचा वेग वाढला असून, महाराष्ट्रातही मागील आठवड्यांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत असल्याचेही जोशी यांनी सांगितले.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured