दलित महासंघाचे विविध मागण्यासाठी तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन

बळीराम रणदिवे


दलित महासंघाचे विविध मागण्यासाठी तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन 


आटपाडी : दलित महासंघ आटपाडी तालुका यांच्या वतीने आटपाडी तहसीलदार कार्यालयासमोर दिनांक ०९ रोजी विविध मागण्यासंदर्भात धरणे आंदोलन होणार असल्याची माहिती दलित महासंघाचे तालुकाध्यक्ष बळीराम रणदिवे यांनी दिली आहे.
यामध्ये  मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे. (अनसूचित जाती मध्ये अ,ब,क व ड असे विभाजन करण्यात यावे.) बार्टीच्या धर्तीवर आर्टीची स्थापना करण्यात यावी. साहित्यरत्न आणाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ पुर्ववत सुरू करण्यात येऊन या महामंडळाचे आर्थिक भागभांडवल रू.एक हजार कोटी करण्यात यावे. सर्व मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे कर्जदारांना सुपूर्णकर्ज माफी देण्यात यावी. साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांना (मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारने समान्मित करणेत यावे. आद्यक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना आयोगाच्या शिफारशी नुसार मान्यता देणेत यावी. मौजे निंबवडे येथील सन 1989 पासुन कायदेशीर प्रस्तावानुसार मागणी असलेल्या खुल्या प्लॉटवरील साहित्यरत्न आणाभाऊ साठे स्मारकास जागा देणेत यावी. दि.04 ऑगस्ट 2018 रोजी आटपाडी शहरातील लोकशाहीर आण्णा भाऊसाठे पुतळा स्थापन करणाऱ्या समस्त मातंग समाजातील 129 कार्यकर्त्यांवरील दाखल केलेले फौजदारी गुन्हा मागे घेणेत यावेत. 
इत्यादी मागणीचे निवेदन आटपाडीचे तहसीलदार यांना देण्यात आले असून निवेदनाच्या प्रति जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, जिल्हाधिकारी सांगली व पोलीस ठाणे आटपाडी यांना देण्यात आले आहे. 


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured