आरोग्य मंत्र्यांच्या आवाजातील बनावट ऑडिओ क्लिप व्हायरल

आरोग्य मंत्र्यांच्या आवाजातील बनावट ऑडिओ क्लिप व्हायरल

 मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आवाजातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याचे समोर आले आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्वीट करून आपल्या आवाजातील बनावट ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याची माहिती दिली आहे.'मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत सध्या सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप माझ्या नावाने व्हायरल होत आहे. मात्र, त्या क्लिपमधील आवाज माझा नाही' असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.


कोरोनाबाबत कोणताही मोठा निर्णय असेल अथवा खबरदारीच्या काही सूचना असतील तर राजेश टोपे हे पत्रकार परिषद घेऊन माहिती देत असतात. पण, काही अज्ञात भामट्यांनी त्यांच्या आवाजाची ऑडिओ क्लीप व्हायरल केली आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
Post a Comment

0 Comments