“आज छत्रपती शिवराय असते तर धनंजय मुंडे, मेहबूब शेख आणि संजय राठोड यांचा कडेलोटच केला असता” : तृप्ती देसाई

मुंबई : धनंजय मुंडे प्रकरण, नंतर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावरील बलात्काराचे आरोप आणि आता पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांचं नाव समोर येत आहे. यामुळे महाविकास आघाडीवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. दरम्यान शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई यांनी देखील या तीन नेत्यांवर निशाणा साधला आहे. आपल्या फेसबुक पोस्ट द्वारे त्यांनी आपले मत व्यक्त केले.

तृप्ती देसाई म्हणाल्या, आज छत्रपती शिवराय असते तर धनंजय मुंडे, मेहबूब शेख आणि संजय राठोड यांच्यावर कठोर कारवाई झाली असती कदाचित कडेलोटच केला असता. कोणतंही प्रकरण दाबलं गेलं नसतं आणि सर्वांना समानच न्याय मिळाला असता, असं म्हणत तृप्ती देसाई यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर निशाणा साधला.

कोपर्डीतील आणि देशातील सर्वच पीडितांना तात्काळ न्याय मिळाला असता. महिलांकडे वाईट नजरेने बघण्याची कोणाची हिंमतच झाली नसती. आज महाराज नाहीत त्यामुळे तक्रार करणाऱ्या महिलांनाच बदनाम करणारी टोळी तयार होत असून महिला सन्मान फक्त कागदोपत्री असल्याचं तृप्ती देसाई म्हणाल्या.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

Post a comment

0 Comments