“दृष्टीकोन पॉझिटिव्ह ठेवला, तर सगळं पॉझिटिव्ह दिसतं” : शिवसेना खासदाराची संभाजीराजेंवर टीका

“दृष्टीकोन पॉझिटिव्ह ठेवला, तर सगळं पॉझिटिव्ह दिसतं” : शिवसेना खासदाराची संभाजीराजेंवर टीका

 “दृष्टीकोन पॉझिटिव्ह ठेवला, तर सगळं पॉझिटिव्ह दिसतं” : शिवसेना खासदाराची संभाजीराजेंवर टीका  

रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने रायगडावर करण्यात आलेल्या प्रकाशव्यवस्थेवरून खासदार संभाजीराजेंनी नाराजी व्यक्त केली होती. सोबतच पुरातत्व खात्यावर निशाणा साधला होता. संभाजीराजेंच्या या टीकेनंतर आता शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी उत्तर दिले आहे.शिवजयंतीनिमित्त श्रीकांत शिंदेंनी रायगडाला भेट दिली. त्यांच्याच फंडातून रायगडावर रोषणाई लावण्यात आली होती. यावेळी त्यांना संभाजीराजेंच्या टीकेबाबत विचारले असता ते म्हणाले की, राजसदर काळोखात होती, महाराज काळोखात होते. मी विद्युत रोषणाई एका प्रमाणिक हेतूने करायला सांगितली होती. रोषणाईही वेगळ्या प्रकारची असू शकते, राजकीय-राष्ट्रीय रोषणाईपण असू शकते, हे मला आज कळलं.दृष्टीकोन पॉझिटिव्ह ठेवला, तर सगळं पॉझिटिव्ह दिसतं, दृष्टीकोन निगेटिव्ह ठेवला, तर सगळं निगेटिव्ह दिसेल, असा जोरदार टोला श्रीकांत शिंदे यांनी संभाजीराजेंना  लगावला.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेसPost a comment

0 Comments