या राज्यांतून तुम्ही राजधानी दिल्लीत दाखल होत असाल तर कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट सोबत घेऊन येणं अनिवार्य

या राज्यांतून तुम्ही राजधानी दिल्लीत दाखल होत असाल तर कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट सोबत घेऊन येणं अनिवार्य

 या राज्यांतून तुम्ही राजधानी दिल्लीत दाखल होत असाल तर कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट सोबत घेऊन येणं अनिवार्य नवी दिल्ली : आता पाच राज्यांतून दिल्लीला येणाऱ्या नागरिकांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट सोबत घेऊन येणं अनिवार्य असणार आहे. रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता दिल्ली सरकारनं हा निर्णय घेतलाय.गेल्या आठवड्यांत आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैंकी ८६ टक्के रुग्ण याच पाच राज्यांतील आहेत. त्यामुळे, या पाच राज्यांच्या नोडल अधिकाऱ्यांना आपल्या स्थानाहून दिल्लीला निघालेल्या नागरिकांना ७२ तासांपर्यंतची निगेटिव्ह आरटी पीसीआर चाचणी रिपोर्ट सुनिश्चित करण्याचे आदेश देण्यात येत आहेत.दिल्ली सरकारचा हा आदेश २६ फेब्रुवारी शुक्रवारी रात्रीपासून ते १५ मार्च दुपारी १२.०० वाजेपर्यंत लागू राहील. म्हणजेच, महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश किंवा पंजाब या राज्यांतून तुम्ही राजधानी दिल्लीत दाखल होत असाल तर तुमच्याकडे निगेटिव्ह आरटी-पीसीआर रिपोर्ट असणं आवश्यक आहे.
हा आदेश विमान, रेल्वे आणि बसमधून प्रवास करत दिल्लीत दाखल होणाऱ्या प्रवाशांना लागू राहील. मात्र, खासगी गाडीने दिल्लीला दाखल होणाऱ्या नागरिकांना मात्र यातून सूट मिळेल.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


Post a comment

0 Comments