“जर चव्हाणच्या पूजाच काय झालं ते सांगितलं नाहीत तर पोहरादेवीची पूजा तरी कशी पावेल?” : या भाजप नेत्याचा राठोड यांच्यावर निशाणा

“जर चव्हाणच्या पूजाच काय झालं ते सांगितलं नाहीत तर पोहरादेवीची पूजा तरी कशी पावेल?” : या भाजप नेत्याचा राठोड यांच्यावर निशाणा “जर चव्हाणच्या पूजाच काय झालं ते सांगितलं नाहीत तर पोहरादेवीची पूजा तरी कशी पावेल?” :  या भाजप नेत्याचा राठोड यांच्यावर निशाणामुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संशयाच्या फेऱ्यात अडकलेले शिवसेनेचे नेते व वनमंत्री संजय राठोड हे आज पंधरा दिवसांनंतर सर्वांसमोर आले आहेत. संजय राठोड आज सपत्नीक पोहरादेवीच्या दर्शनासाठी आले असता भाजपचे नेते केशव उपाध्ये यांनी संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला.
“जर चव्हाणच्या पूजाच काय झालं ते सांगितलं नाहीत तर पोहरादेवीची पूजा तरी कशी पावेल?” असा सवाल उपाध्ये यांनी केला आहे. युवतीच्या मृत्यूप्रकरणात नाव आलेले मंत्री १५ दिवस गायब होतात. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला हरताळ फासत हे मंत्री सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडवत शक्ती प्रदर्शन करतात. सत्तेची अपरिहार्यता असू शकेल. मुख्यमंत्री किमान कोरोनाचे नियम मोडल्याचा गुन्हा दाखल तरी करणार का?, असंही उपाध्ये म्हणाले.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
Post a comment

0 Comments