औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना कोरोनाची लागण

औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना कोरोनाची लागण


औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना कोरोनाची लागणऔरंगाबाद : राज्यात कमी झालेली कोरोनारुग्णांची संख्या आता पुन्हा एकदा वाढू लागली आहे. दरम्यान, राज्यातील अनेक नेत्यांना कोरोना झाला आहे. औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना कोरोनाची लागण झाली आहे. इम्तियाज जलील यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली असून, पुढील उपचारासाठी ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत.
मला आज कोरोनाची लागण झाली असून, 3 दिवसांपासून मला लक्षणे होती. तेव्हापासूनच मी स्वतःला आयसोलेट करून घेतले होते. पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे, अशी माहिती जलील यांनी ट्विट करत दिली.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

Post a comment

0 Comments