“महाराष्ट्राचा मुख्यमंत्री खोटारडा” : ‘या’ भाजप नेत्याने केली मुख्यमंत्र्यावर टीका

“महाराष्ट्राचा मुख्यमंत्री खोटारडा” : ‘या’ भाजप नेत्याने केली मुख्यमंत्र्यावर टीका

 “महाराष्ट्राचा मुख्यमंत्री खोटारडा” : ‘या’ भाजप नेत्याने केली मुख्यमंत्र्यावर टीका 

मुंबई : नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन केले नाहीतर लॉकडाऊन हाच शेवटचा पर्याय असेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. सोबतच, यावेळी बोलताना त्यांनी देशातून साऊथ आफ्रिकेत पाठवलेल्या कोरोना लसींचे डोस पुन्हा भारतात पाठवण्यात आले आहेत. या लसीचे डोस देशासाठी उपयोगी ठरतील, असेही म्हणाले. मात्र आता भाजपकडून त्यांच्या या विधानावरून टीका केली जात असून, त्यांचे वक्तव्य खोटे असल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री थापा मारतात हे आम्हाला ठाऊक होतं, ते खोटंही बोलतात हे आज महाराष्ट्राने पाहिलं. आफ्रिकेत पाठवलेल्या लसीबद्दल ते जे बोलले ते सफेद झूठ आहे. आफ्रिकेकडून तसा खुलासाही आला आहे. मोदीद्वेषाची कावीळ बळावल्याचे हे परिणाम. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री खोटारडा आहे, अशा शब्दात भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला आहे.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
Post a comment

0 Comments