पतंजलीच्या कोरोनिल औषध विक्रीस महाराष्ट्रात बंदी : अनिल देशमुख

पतंजलीच्या कोरोनिल औषध विक्रीस महाराष्ट्रात बंदी : अनिल देशमुख

 पतंजलीच्या कोरोनिल औषध विक्रीस महाराष्ट्रात बंदी : अनिल देशमुखमुंबई : रामदेव बाबा यांच्या पतंजली या कंपनीने तयार केलेल्या कोरोनिल या औधषाचे केंद्रीय मंत्री हर्षवर्धन आणि नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थिती जोरदार लाँचिंग करण्यात आले. या औषधाला जागतिक आरोग्य संघटनेकडून प्रमाणपत्र मिळाले असल्याचे देखील सांगण्यात आले. मात्र नंतर हा दावा खोटा असल्याचे समोर आले होते.
आता महाराष्ट्र सरकारकडून देखील या औषधावर राज्यात बंदी घालण्यात आली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांन ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. कोरोनिल औषधावर इंडियन मेडिकल असोसिएशनने देखील आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने हे पाऊल उचलले आहे.


पतंजलीच्या कोरोनिल औषधाच्या वैद्यकीय चाचणीवर आयएमएने प्रश्न उपस्थित केले असून WHO ने सुद्धा हे औषध कोरोनावर परिणामकारक असल्याचा पतंजली आयुर्वेदचा चुकीचा दावा फेटाळला आहे. इतक्या घाईने हे औषध बाजारात आणणं आणि दोन ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी याला समर्थन देणं योग्य नाही, असे अनिल देशमुख म्हणाले.
WHO, IMA व इतर संबंधित सक्षम आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणीकरण झाल्याशिवाय पतंजलीच्या कोरोनिल औषध विक्रीस महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
Post a comment

0 Comments