पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नावाने बोगस ॲप तयार करून लोकांना फसविणाऱ्या रॅकेटचा मुंबई सायबर पोलिसांनी केला पर्दाफाश

पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नावाने बोगस ॲप तयार करून लोकांना फसविणाऱ्या रॅकेटचा मुंबई सायबर पोलिसांनी केला पर्दाफाश

 पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नावाने बोगस ॲप तयार करून लोकांना फसविणाऱ्या रॅकेटचा मुंबई सायबर पोलिसांनी केला पर्दाफाशमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच शासनाच्या नावाने बोगस ॲप तयार करून देशभरातील सुमारे अडीच लाख लोकांना फसविणाऱ्या रॅकेटचा मुंबई सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी याप्रकरणी राजस्थान आणि उत्तर प्रदेश येथून चार जणांना अटक केली असून या चौघांनी ४ ते ५ कोटींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. कर्ज देतो सांगून प्रोसेसिंग फी, नोंदणी फी च्या नावाखाली ही टोळी सर्वसामान्य लोकांकडून पैसे उकळत होती.
पुण्यातील सूरज सावळे या तरुणाला कर्जासाठी दिलेली प्रोसेसिंग फी परत करण्याबाबत वारंवार फोन तसेच, धमकीचे संदेश येत होते. सूरज याने याबाबत तक्रार केल्यानंतर तत्काळ गुन्हा दाखल करून सायबर पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक तपासादरम्यान पोलिसांना यामध्ये काही ॲपच्या लिंक आणि मोबाइल नंबर मिळाले. हे आरोपी उत्तर प्रदेशच्या अलिगढ येथून लोकांची फसवणूक करीत असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे यातील एक आरोपी राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याचे समजले. घांना उत्तर प्रदेश आणि राजस्थान येथून अटक केली.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
Post a Comment

0 Comments