Type Here to Get Search Results !

सांगलीत पालिकेवर झेंडा फडकावत राष्ट्रवादीचा भाजपला धक्का

 



सांगलीत पालिकेवर झेंडा फडकावत राष्ट्रवादीचा भाजपला धक्का 



सांगली :  सांगली महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक आज पार पडली. भाजपकडे असणारी ही महापालिका काँग्रेस राष्ट्रवादी कडे जाणार का याकडे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. पण, अखेर आज मतदान प्रक्रिया पार पडली आणि राष्ट्रवादीने सत्ता खेचून आणली.




महापौर निवडणुकीसाठी भाजपकडून धीरज सूर्यवंशी, राष्ट्रवादीकडून दिग्विजय सूर्यवंशी मैदानात उतरले होते. पण, आधीच भाजपचे सात नगरसेवक हे राष्ट्रवादीच्या गळाला लागले होते. त्यामुळे सांगली महापालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात जाणार अशी दाट शक्यता होती. सकाळी 11 वाजता कोरोनाच्या काळामुळे ऑनलाईन मतदान घेण्यात आले. यात भाजपाची पाच मते फुटली. या पाचही नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान केलं. दिग्विजय सूर्यवंशी यांना 39 मतं पडली  तर भाजप च्या धीरज सूर्यवंशी यांना 36 मतं मिळाली. दिग्विजय सूर्यवंशी यांनी धीरज सूर्यवंशी यांचा 3 मतांनी पराभव केला. भाजपची सहा मत फुटली तर दोन नगरसेवक अनुपस्थित राहिले.





सांगली महापालिकेत भाजपकडे 43 काँग्रेस 19 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 15 नगरसेवक आहेत. तरीही महापौरपदासाठी राष्ट्रवादीचे पारडं जड होतं. अखेर जयंत पाटलांनी आपल्या होमग्राऊंडमध्ये दमदार खेळी करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पराभव केला.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies