“नानाजी मांजरा सारखं वागताय डोळे मिटून सगळे नियम मोडताय” : या भाजप नेत्याने केली नाना पटोलेंच्यावर टीका

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या कुटुंबातील व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने ते आयसोलेशनमध्ये राहणार होते. मात्र तरीही शिवजयंतीनिमित्त ते जुहू येथील कार्यक्रमात सहभागी झाल्याने आता भाजपकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे.
शिवजयंतीनिमित्त राज्य सरकारकडून निर्बंध घालण्यात आले होते. तसेच शिवनेवरील कलम 144 लागू करण्यात आले होते. मात्र दुसरीकडे अनेक नेते शिवजयंतीच्या निमित्ताने कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावरून भाजपने पटोलेंवर हल्ला चढवला आहे.
नाना च्या नाना तऱ्हा! ‘सकाळी आयसोलेशन अन् रात्री सेलिब्रेशन!हाच आहे काँग्रेसचा तमाशा. स्वतःचे कार्यक्रम जोशात साजरे करायचे आणि असेच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरे करणाऱ्यांना 144 कलम लावून अटक करायचे! नानाजी मांजरा सारखं वागताय डोळे मिटून सगळे नियम मोडताय, असा जोरदार टोला देखील भाजप नेते प्रसाद लाड यांनी पटोलेंना लगावला.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेसPost a comment

0 Comments