संत्रा उत्पादक शेतकरी बांधवांना होणार सीट्रस प्रकल्पाचा लाभ – राज्यमंत्री बच्चू कडू

संत्रा उत्पादक शेतकरी बांधवांना होणार सीट्रस प्रकल्पाचा लाभ – राज्यमंत्री बच्चू कडूसंत्रा उत्पादक शेतकरी बांधवांना होणार सीट्रस प्रकल्पाचा लाभ – राज्यमंत्री बच्चू कडू


मुंबई: जिल्ह्यातील मुख्य फळपीक असलेल्या संत्रा या फळपिकाची गुणवत्ता व दर्जा सुधारून ती निर्यातक्षम केली जाणार आहे. त्यासाठी सिट्रस प्रकल्प उभारला जाणार असून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा लाभ  होणार असल्याचे शिक्षण, जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.

 

या प्रकल्पाबाबत राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडू यांनी मुंबईत बैठक घेऊन अधिकारी वर्गासोबत चर्चा केली व याप्रकरणी गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

 

 अचलपूर मतदार संघात 26 हजार हेक्टर जमिनीवर संत्रा बागा आहेत.मात्र आतापर्यत दर्जा व गुणवत्ता सुधारण्याची कुठलिही व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला मिळायचा. हा प्रकल्प स्थापन झाल्यावर चांदुर बाजार,अचलपूर,धारणी,अचलपुर,दर्यापूर, वरूड, मोर्शी, चिखलदरा व आकोटपर्यंतच्या संत्रा बागायतदार शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे.

 

या प्रकल्पात उच्च तंत्रज्ञानावर आधारीत रोपवाटिका स्थापन करणे, मातृवृक्ष, शेडनेट, पॉलीहाऊस उभारणी, उच्च तंत्रज्ञानावर आधारीत सिंचन सुविधा निर्माण करणे. विविध प्रशासकीय इमारतीचे बांधकाम कार्यालय, माती, पाणी व उती पाने प्रयोगशाळा, निवासी प्रशिक्षण भवन, निविष्ठा विक्री केंद्र, अवजारे गृह व गोडाऊन, काढणित्तोर संत्रा फळप्रक्रिया व मूल्यवर्धन तंत्रज्ञान, अवजारे बँक, संत्रा फळ पिकावर संशोधन, शेतकरी प्रशिक्षण व तंत्रज्ञान प्रात्याक्षिके इत्यादी बाबींचा प्रामुख्याने  समावेश राहणार आहे. त्याचा जिल्ह्यातील संत्रा उत्पादक  शेतकरी बांधवांना लाभ होईल, असा विश्वास राज्यमंत्री श्री. कडू यांनी व्यक्त केला.


Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेस


Post a comment

0 Comments