पंतप्रधान मोदी घेणार बैठक ; बैठकीसाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रण

पंतप्रधान मोदी घेणार बैठक ; बैठकीसाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रण

 पंतप्रधान मोदी घेणार बैठक ; बैठकीसाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रण

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी आज कोरोना काळातील केलेल्या उपाययोजना, लसीकरण आणि नागरिकांचे आरोग्य या विषयावर नीती आयोगाची बैठक घेणार आहेत. नीती आयोगाचे सर्व सदस्य यामध्ये सामील होणार आहेत. या बैठकीसाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. 
या बैठकीला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित राहणार आहेत. बिहारच्या संबंधी काही महत्वाचे विषय ते नीती आयोगाच्या बैठकीत मांडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील सहावी बैठक असेल. या बैठकीच्या अजेंड्यावर कृषी, पायाभूत सुविधा, मानव संसाधन विकास, मूलभूत सुविधा आणि आरोग्य हे विषय असतील असे सांगण्यात येते. सर्व केंद्रीय मंत्री, नीती आयोगाचे पदसिद्ध सदस्य, नीती आयोगाचे उपाध्यक्ष आणि सदस्य आणि सरकारचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित असतील. 

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेसPost a comment

0 Comments