पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरण आता थंडावणार ; वडील लहूदास चव्हाण यांचा तक्रार देण्यास नकार

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरण आता थंडावणार ; वडील लहूदास चव्हाण यांचा तक्रार देण्यास नकार

 पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरण आता थंडावणार ; वडील लहूदास चव्हाण यांचा  तक्रार देणार नकार 


बीड : पूजा चव्हाण हिने आत्महत्या केल्यानंतर राजकीय पक्षांनी हे प्रकरण उचलून धरले आहे. याशिवाय, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्याकडूनही पूजा चव्हाण प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. मात्र, पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी तृप्ती देसाई यांना विनंती केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी काल पूजाच्या कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी पूजाचे वडील लहूदास चव्हाण यांनी मी तक्रार देणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे. एक मुलगी गेली मात्र मला पाच मुली आहेत आम्हाला जगू द्या आम्ही यातून आता सावरलो आहेत. मला कोणाबद्दलही तक्रार द्यायची नाही असं लहूदास चव्हाण यांनी तृप्ती देसाईंना सांगितले.त्यामुळे आता याप्रकरणात पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांकडून तक्रार केली जाण्याची शक्यता जवळपास मावळल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरण आता थंडावणार, असा कयास बांधला जात आहे. मात्र, यामुळे चव्हाण कुटुंबावर कोणाचा दबाव आहे का? हा प्रश्न उपस्थित होतोय. तक्रारच नसल्याने पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात तपास करण्यात पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
Post a comment

0 Comments