“खासगी रुग्णालयांनाही लसीकरण सुरू करण्यास परवानगी द्यायला हवी” : मनसे आमदारांनी केली मागणी

“खासगी रुग्णालयांनाही लसीकरण सुरू करण्यास परवानगी द्यायला हवी” : मनसे आमदारांनी केली मागणी

 “खासगी रुग्णालयांनाही लसीकरण सुरू करण्यास परवानगी द्यायला हवी” : मनसे आमदारांनी केली मागणी 

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्रात 9 लाखांपेक्षा अधिक कोरोना योद्धांना लस देण्यात आली आहे. केंद्र सरकारने राज्यांना लसीकरणाचा वेग वाढवण्यास सांगितला आहे. याच पार्श्वभूमीवर आता लसीकरणासाठी खासगी कंपन्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.
पुण्यातील ‘सीरम’ तसेच हैदराबादच्या ‘भारत बायोटेक’ मध्ये कोरोना लशींचा भरपूर साठा उपलब्ध आहे. असे असताना लशीकरणाचा वेग वाढवायचा असेल तर खासगी रुग्णालयांनाही लसीकरण सुरू करण्यास परवानगी द्यायला हवी. राज्याने केंद्राकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी ट्विट करत राजू पाटील यांनी केली आहे.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
Post a comment

0 Comments