“समुद्राचे पाणी गोडे करायला निघालात पावसाचे पाणी घरात घुसते त्याचे काय?” : ‘या’ भाजप नेत्याने केली शिवसेनेवर टीका

“समुद्राचे पाणी गोडे करायला निघालात पावसाचे पाणी घरात घुसते त्याचे काय?” : ‘या’ भाजप नेत्याने केली शिवसेनेवर टीकामुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संपर्क अभियान राबवणार आहे. यावरून आता भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.


घराघरात जाताय? जा जा, मुंबईकर तुमची वाटच पाहत आहेत. कोरोनाला घाबरून “घराघरात” लपून का बसला होतात? मुख्यमंत्र्यांसह सगळे तुम्ही तेव्हा कुठे होतात? एकही रुपयांची मदत का दिलीत नाहीत? अवाजवी वाढीव वीज बिले पाठवून का छळताय?, चला..चला..मंत्र्यांच्या कॅराव्हानध्ये बसूया.. थंडाथंडा- कुलकुल म्हणत गावोगावी फिरूया.. वीज तोडलेल्या गरिबांच्या झोपड्या पाहूया.. कोकणात शँक मध्ये राहूया... फेसाळलेल्या समुद्रामध्ये बेधुंद होऊया! मुंबईत पेग, पब आणि पार्ट्या पाहू! झिंग-झिंग झिंगाट होऊन जाऊ!!असा जोरदार टोला आशिष शेलारांनी शिवसेनेला लगावला आहे.

 
बिल्डर, दारूवाले, टाटाना सवलतीची खैरात, मग समान्य मुंबईकरांना काय दिलेत?  समुद्राचे पाणी गोडे करायला निघालात पावसाचे पाणी घरात घुसते त्याचे काय? आता उपनगरात एनए टँक्स वसूली करुन पाकिटमारी का करताय? असे सवाल देखील त्यांनी केले.


लस उपलब्ध असतानाही लसीकरणात महाराष्ट्र मागे पडला. कोरोना लसीबाबत मंत्र्यांनीच गैरसमज पसरवले. राज्यातील साडेचार लाख आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरणच झाले नाही. सरकार अपयशी ठरले. महाराष्ट्रात रडव्यांचे रडगाणे सुरुच राहिले आणि पुन्हा कोरोनाने डोकेवर काढले आहे, अशी टीका आशिष शेलारांनी केली.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेसPost a comment

0 Comments