कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी नागरिकांना केले हे आवाहन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी नागरिकांना केले हे आवाहन

 मुंबई :  राज्यात दररोज जवळपास 5 हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण आढळत आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्यानंतर आता राज्य सरकारकडून खबरादारीचे उपाय केले जात आहे. प्रशासनाला याबाबत निर्देश दिले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी देखील ट्विट करत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. निर्बंध हटवले असले तरीही तुम्ही कोणत्या ठिकाणी जात आहात, याची आधी काळजी घ्या, असे पवारांनी म्हटले आहे.
गर्दीची ठिकाणे, लोकांशी अगदी जवळ जावून संभाषण करणे आणि खेळती हवा नसणाऱ्या बंद ठिकाणी जाणे टाळायलाच हवं, असे आवाहन शरद पवारांनी केले आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
Post a comment

0 Comments