सातारा : भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि विधान परिषदेचे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यातील शाब्दिक चकमक मागील काही दिवसात चर्चेचा विषय ठरली होती. मात्र शिवेंद्रराजेंनी मागील काही दिवसात राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीनंतर ते पुन्हा पक्षात परतणार का ? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यातच आता ‘शशिकांत शिंदे आणि मी एकच’, असे वक्तव्य शिवेंद्रराजेंनी केल्याने चर्चांना अधिकच उधाण आले आहे.
शशिकांत शिंदे आणि मी एकच आहे. त्यामुळे कुणाला कुणीकडेही जाऊ दे, मात्र गावांचा तालुक्याचा विकास करणे हा एकच आमचा उद्देश आहे. गरज असलेल्या महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत. त्यास प्राधान्य दिले जाईल, असे वक्तव्य यावेळी शिवेंद्रराजेंनी केल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
0 Comments