अक्कड़ बक्कड़ बंबे बो डिझल नब्बे, पेट्रोल सौ !

अक्कड़ बक्कड़ बंबे बो डिझल नब्बे, पेट्रोल सौ !
आटपाडी : देशामध्ये सध्या इंधन दरवाढी वरून ठिकठिकाणी विरोधी पक्षाकडून वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने सुरु आहेत. तर अनेकजण सरकारवर सोशल मिडीयाच्या माध्यमातून टीका टिप्पणी करत आहेत. 
शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोडकर यांनी सुद्धा केंद्र सरकारवर इंधन दरवाढीवरून टीका केली आहे. त्यांनी ट्वीट करीत “अक्कड़ बक्कड़ बंबे बो डीजल नब्बे पेट्रोल सौ सौ मे लगा धागा सिलेंडर ऊछल के भागा” असे म्हणत टीका केली आहे. सध्या देशात पेट्रोलच्या दराने १०० पार केली आहे तर डिझेल चे दर ९० च्या आसपास आले आहेत. सर्वसामन्यांच्या घरामध्ये इंधनासाठी वापरला जाणारा गॅसच्या किमतीमध्ये ही वाढ झाली आहे. यावरून उर्मिला मातोडकर यांनी केंद्र सरकारवर निशाना साधला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी इंधन दरवाढीवरून अभिनेते अक्षयकुमार, अभिताभ बच्चन यांच्यावर हि टीका केली होती. ज्यावेळी मनमोहनसिंग यांचे सरकार होते त्यावेळी अक्षयकुमार व अभिताभ बच्चन यांनी इंधन दरवाढीवरून त्यावेळच्या मनमोहनसिंग सरकारवर टीका केली होती.


 


त्यामुळे आता अक्षयकुमार व अभिताभ बच्चन यांना दरवाढ झालेली दिसत नाही का? असे म्हणत नाना पटोले यांनी त्यांचे सिनेमे तसेच सिनेमाचे शुटींग राज्यात होवू देणार नसल्याचा इशारा देखील दिला आहे. 


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस 


Post a comment

0 Comments