Type Here to Get Search Results !

धक्कादायक : राज्यात 'या' शहरांमध्ये आढळला कोरोना विषाणूचा नवा प्रकार

 



यवतमाळ : यवतमाळ आणि अमरावतीमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळला आहे. हा कोरोनाचा नवा विषाणू अँटीबॉडीजनाही चकवा देत असल्याचं उघड झालंय. अमरावती आणि यवतमाळमध्ये कोरोनाचा पुन्हा वेगाने प्रसार होतोय. राज्यात २४ सँपल्सचं जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आलं होतं.




अमरावती, यवतमाळ आणि साताऱ्यातून प्रत्येकी चार आणि पुण्यातून १२ सँपल्सचं जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आलं होतं. यापैकी अमरावती, यवतमाळ आणि सातारा जिल्ह्यातून आलेल्या सँपल्समध्ये वेगळं म्युटेशन आढळलं. अमरावतीत E484K हे म्युटेशन आढळलंय. 


तर यवतमाळमधील सँपल्समध्ये N440K हा आंध्रप्रदेशात आढळणारा म्युटेशन सापडलाय. हे दोन्ही प्रकार अँटीबॉडीजना चकवा देतात. दिल्लीत ज्या रूग्णांना कोरोनाची पुन्हा लागण झालीय त्यांना या प्रकाराची लागण झालीय. तर साताऱ्याच्या सँपल्समध्ये V911I हा नवा प्रकार आढळला आहे. मात्र याचे फारसे रेफरन्सेस आढळत नाहीत. मात्र त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे भारतात आढळणाऱ्या A2 टाईपचेच हे कोरोनाचे प्रकार आहेत. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies