धक्कादायक : आणखी एका अभिनेत्याने केली आत्महत्या

धक्कादायक : आणखी एका अभिनेत्याने केली आत्महत्या

 

धक्कादायक : आणखी एका अभिनेत्याने केली आत्महत्या 


मुंबई : अभिनेता संदीप नाहर नंतर आता तमिळ टीव्ही अभिनेता इंद्र कुमारच्या आत्महत्येनं सर्वांनाच धक्का बसला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार इंद्र कुमारनं त्याच्या मित्राच्या घरीच गळफास घेत आत्महत्या केली. तो मित्राला भेटायला त्याच्या घरी गेला होता. बुधवारी संध्याकाळी इंद्र कुमार आणि त्याचा मित्र चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. 
तिथून परतल्यावर इंद्रकुमार त्याच्या मित्राच्या घरी एकटा होता. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मित्रानं त्याच्या रुमचा दरवाजा ठोठावला तेव्हा इंद्रने दरवाजा उघडला नाही म्हणून त्याच्या मित्रानं रुमचा दरवाज उघडला पण त्यावेळी त्याला इंद्राचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. इंद्र कुमारच्या मित्रानं लगेचच याविषयी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहे.
दरम्यान इंद्रने ज्या रुममध्ये आत्महत्या केली त्या ठिकाणी कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. त्यामुळे इंद्र कुमारनं हे टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण समजू शकलेलं नाही. इंद्र कुमार विवाहित असून त्याला एक मुलगा सुद्धा आहे. त्यानं अनेक तमिळ टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. 


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेसPost a comment

0 Comments