Type Here to Get Search Results !

धक्कादायक : माणसालाही होते बर्ड फ्लूची लागण? ; रशियात H5N8 स्ट्रेनची सात जणांना लागण

 





धक्कादायक : माणसालाही होते बर्ड फ्लूची लागण? ; रशियात H5N8 स्ट्रेनची सात जणांना लागण


नवी दिल्ली : बर्ड फ्लू हा आजार फक्त पक्ष्यांनाच होत असून त्याचा माणसांना कोणताही धोका नसल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र,पक्ष्यांपासून बर्ड फ्लूचा माणसाला संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे. रशियात पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या कामगारांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाला आहे. माणसाला बर्ड फ्लूची लागण होण्याची ही जगातील पहिलीच घटना असून, या घटनेची माहिती जागतिक आरोग्य संघटनेलाही देण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना पाठोपाठ आणखी एक नवं संकट उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



गेल्या काही महिन्यांपासून रशियासह युरोप, चीन, उत्तर आफ्रिका आणि मध्य पूर्वेतील देशांमध्ये बर्ड फ्लू’चा ( H5N8 ) उद्रेक झाला आहे. मात्र, केवळ पोल्ट्री कोंबड्यांना या विषाणूचा संसर्ग होत असल्याचं दिसून येत होतं. मात्र, आता माणसालाही याचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. रशियात पहिल्यादाच बर्ड फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. ग्राहक आरोग्य वॉचडॉक रोस्पोट्रेबनाडझोरचे प्रमुख अॅना पोपोवा यांनी ही माहिती दिली आहे.



माणसाला बर्ड फ्लूचा संसर्ग होण्याची शक्यता नाहीत. मात्र, बर्ड फ्लूने संक्रमित जिवंत वा मृत कोंबडीच्या थेट संपर्कात आल्यानं संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यवस्थितपणे शिजवून खालेलं अन्न सुरक्षित आहे. माणसाला बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेलाही देण्यात आली आहे,” असं पोपोवा म्हणाल्या.




दक्षिण रशियात एका पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या सात कामगारांना बर्ड फ्लूची लागण झाली आहे. या पोल्ट्री फार्ममध्ये डिसेंबरमध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक झाला होता. मात्र, अशी परिस्थिती पुन्हा निर्माण झाली नाही, असं पोपोवा यांनी सांगितलं. वेगवेगळ्या देशात स्थलांतर करणाऱ्या पक्षांमुळे बर्ड फ्लूचा प्रसार वेगानं झाल्याचं त्या म्हणाल्या. त्यामुळे प्रत्येक देशाने पोल्ट्रीचे प्रकल्प बंदिस्त स्वरूपात किंवा स्थलांतर करणाऱ्या पक्षांचा संपर्क होणार नाही, अशा पद्धतीने करावेत, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.



बर्ड फ्लूचा फैलाव कसा होतो? आणि त्यापासून बचाव कसा करायचा? असा सवाल नेहमीच केला जातो. कोणत्याही संक्रमित पक्ष्याचं मांस खाल्ल्याने किंवा या पक्ष्यांसोबत पाण्यात राहिल्यास बर्ड फ्लू होण्याची शक्यता आहे. बर्ड फ्लू हा श्वसनाशी संबंधित आजार असून त्यामुळे जीवही जाऊ शकतो. घसा खवखवणे, खोकला, न्युमोनिया, ताप, अंग दुखी आदी बर्ड फ्लूची लक्षणे आहेत. 

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies