‘राज्य सरकार वादग्रस्त मंत्र्यांना पाठीशी घालत आहे’ : शर्मिला ठाकरे

‘राज्य सरकार वादग्रस्त मंत्र्यांना पाठीशी घालत आहे’ : शर्मिला ठाकरे
 ‘राज्य सरकार वादग्रस्त मंत्र्यांना पाठीशी घालत आहे’ : शर्मिला ठाकरे


मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या वसईत एका कार्यक्रमानिमित्त आल्या होत्या. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. तसेच, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर भाष्य करताना त्यांनी राज्य सरकार वादग्रस्त मंत्र्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला आहे.कोरोनारुग्ण संख्या वाढल्याने पुन्हा लॉकडाऊनची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, नागरिकांचे आयुष्य आणि त्याच बरोबर त्यांची नोकरी, अशा दोन्ही बाजूंचा सरकारने विचार करायला हवा. ज्यांच्या कोरोनाकाळात नोकऱ्या गेल्या आहेत. त्यांना सरकारने आर्थिक मदत दिली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. तसेच, आगामी निवडणुकांमध्ये मनसे पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे देखील त्या यावेळी म्हणाल्या.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


Post a comment

0 Comments