प्रत्येक कोरोना रुग्णामागे 20 ते 30 जणांची तपासणी करण्याचे आरोग्यमंत्र्यांनी दिले आदेश

प्रत्येक कोरोना रुग्णामागे 20 ते 30 जणांची तपासणी करण्याचे आरोग्यमंत्र्यांनी दिले आदेश
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आज तीन ते चार महिन्यांच्या कालावधीनंतर कोरोनाच्या रुग्ण संख्येने 5 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. नागरिकांनी ही बाब गांभिर्याने घेऊन सोशल डिस्टंसिंग,मास्क आणि सॅनिटायजरचा वापर करावा, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केले आहे. सोबतच, प्रत्येक कोरोना रुग्णामागे 20 ते 30 जणांची तपासणी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
अमरावती, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या जिल्ह्यातील ज्या भागात रुग्ण संख्या जास्त आढळून येत आहे तेथे कंटेनमेंट झोन जाहीर करुन तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी मुख्य सचिवांनी दिले आहेत.


सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवावे. एका रुग्णामागे किमान 20 ते 30 निकट सहवासितांची तपासणी करुन चाचण्यांचे प्रमाण वाढवावे आणि पॉझिटिव्हिटी दर 10% पेक्षा खाली आणावा असे निर्देश राजेश टोपेंनी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना दिले आहेत.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
Post a comment

0 Comments