खासदार मोहन डेलकर यांच्या मृत्यूनंतर पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्ये आली ही माहिती समोर

खासदार मोहन डेलकर यांच्या मृत्यूनंतर पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्ये आली ही माहिती समोर

खासदार मोहन डेलकर यांच्या मृत्यूनंतर पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्ये आली ही माहिती समोर मुंबई : मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथील हॉटेल सी ग्रीनमध्ये खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्याने अनेकांना धक्का बसला. दादरा-नगर हवेलीच्या खासदाराची मुंबईत आत्महत्या का केली आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. गुजराती भाषेत लिहिलेली सुसाईड नोटही याठिकाणी सापडली आहे. सहा पानांच्या सुसाईड नोटमध्ये 40 जणांची नावे आहेत. 
मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर त्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे. त्याचा रिपोर्ट आला असून श्वास बंद झाल्याचे म्हटले आहे. मात्र, फॉरेंसिक रिपोर्ट हाती येणे बाकी आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे खरे कारण पुढे आलेले नाही. त्यानंतर खरे कारण पुढे येईल. सुसाईट नोटमध्ये नेमकं कारण काय आहे. याबाबत अजून माहिती पुढे आलेली नाही. मात्र, 40 जणांची नावे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे लोक कोण आहेत, याची उत्सुकता आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
 

Post a Comment

0 Comments