राष्ट्रवादीच्या “या” ज्येष्ठ नेत्याला तिसऱ्यांदा कोरोनाची लागण

राष्ट्रवादीच्या “या” ज्येष्ठ नेत्याला तिसऱ्यांदा कोरोनाची लागण

 मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. एकनाथ खडसे यांनी ट्वीट करून कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. 'माझी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली असून माझी तब्येत चांगली आहे, काळजीचे कारण नाही' असं खडसे यांनी सांगितले. तसंच, 'गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी' असं आवाहनही खडसे यांनी केले आहे.
एकनाथ खडसे यांना याआधीही दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती. रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर खडसे यांचीही कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर भोसरी जमीन घोटाळ्या प्रकरणी ईडीने चौकशीसाठी मुंबईत बोलावले असता खडसे यांची पुन्हा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर आता तिसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
Post a comment

0 Comments