Type Here to Get Search Results !

मनपाच्या आकृतिबंधचा सोमवारी शासन निर्णय निघणार – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेऔरंगाबाद  : औरंगाबाद महानगरपालिकेचा अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला आकृतिबंधच्या निर्णयाबाबत सोमवारी शासन निर्णय निघणार असल्याची माहिती  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.
आज महानगरपालिका मुख्यालय येथील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे सभागृह येथे एकत्रित विकास नियमावली (युनिफाईड डिसीआर)अंमलबजावणी व विकास कामांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मनपा आकृतिबंधच्या विषयी मंत्री श्री. शिंदे म्हणाले, येत्या सोमवारी शासन निर्णय निघणार आहे यामुळे महानगरपालिकेतील रिक्त जागा भरणे व पदोन्नती देण्याचा मार्ग मोकळा होईल.
विकास आराखडा मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, प्रस्तवित विकास आराखड्यानुसार डीपी रोड बाबतची आखणी वारंवार करावी. जेणे करून अनधिकृत बांधकामे होणार नाहीत आणि नागरिकांना याची जाणीव होऊन भविष्यात या ठिकाणी अनधिकृत वस्ती, प्लॉटिंग होणार नाही. याबाबत महानगरपालिकेने त्वरित अंमलबजावणी करावी. विविध प्रकारच्या विकास योजनांसाठी शासन निधी देत आहे याशिवाय महानगरपालिकेनेसुद्धा इतर महानगरपालिकेसारखे उपाय योजना करून ‘स्व’निधी उभारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी नवीन उत्पन्न स्रोत निर्माण करावेत, यासाठी शासन सर्वोतोपरी मदत करेल, असेही त्यांनी सांगितले. नवीन युनिफाईड डिसीआर नियमावली नुसार देण्यात येणाऱ्या एफएसआयचा गैरवापर होणार नाही. नवीन घरे घेणाऱ्यांची फसवणूक होणार नाही. अतिरिक्त क्षेत्रफळ वाढल्यामुळे घरांच्या किमती नियंत्रणात राहणार आहेत. तसेच 1500 स्क्वेअर फूट पर्यंत परवानगीची गरज राहणार नाही आणि 3000 स्क्वेअर फूट पर्यंतची बांधकाम परवानगीसाठी नागरिकांनी रीतसर अर्ज दाखल केल्यानंतर मनपाने 10 दिवसात परवानगी दिलेच पाहिजे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
नवीन तयार होणाऱ्या इमारती मधील सांस्कृतिक कार्यक्रमासाठी (Recreation floor) आणि इतर कार्यक्रमासाठी एक मजल्यासाठी एफएसआय देण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी एकत्रित काम करून शहराच्या विकासासाठी प्रयत्न करावे, असेही ते म्हणाले. तसेच शहरात होत असलेले विकास कामे यांचा आढावा घेऊन प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या कार्याचे कौतुक केले.

या बैठकीचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी प्रास्ताविक केले. यात महानगरपालिकेतर्फे हाती घेण्यात आलेल्या विविध योजना आणि प्रकल्प जसे की, नवीन पाणी पुरवठा योजना, 150 कोटींचे रस्ते, पूर्ण झालेले आणि प्रस्तावित घनकचरा प्रक्रिया प्रकल्प, कोविड व्यवस्थापन, कोविड लसीकरण, मेलट्रॉन हॉस्पिटल, आकृतिबंध, पथदिवे, अमृत योजना, माझी वसुंधरा आणि स्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यात आलेल्या प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली. यावेळी युनिफाईड डिसीआर अंमलबजावणी बाबत सहायक संचालक नगर रचना विभाग जयंत खरवडकर यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे सादरीकरण केले. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी विविध सूचना केल्या या सूचनांची दखल घेऊन त्या प्राधान्यक्रमाने लवकरात लवकर सोडविल्या जातील, अशी ग्वाही मंत्री श्री. शिंदे यांनी दिली.

या बैठकीसाठी  रोहयो मंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार हरिभाऊ बागडे, सर्वश्री आमदार अंबादास दानवे , संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, उदय सिंग राजपूत, कल्याण काळे,महानगरपालिकेचे माजी पदाधिकारी नंदकुमार घोडेले, राजेंद्र जंजाळ, विकास जैन ,श्रीमती जयश्री कुलकर्णी, रेणुका दास(राजू) वैद्य, मकरंद कुलकर्णी, भाऊसाहेब जगताप, गंगाधर ढगे आदींसह नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, चंद्रकांत खैरे, महानगरपालिका अधिकारी, स्मार्ट सिटी चे अधिकारी यांची उपस्थिती होती.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies