'तुम्ही शेण खायचे आणि समाजाला..’ : भाजपा महिला नेत्याचा राठोड यांच्यावर हल्लाबोल

'तुम्ही शेण खायचे आणि समाजाला..’ : भाजपा महिला नेत्याचा राठोड यांच्यावर हल्लाबोल

 'तुम्ही शेण खायचे आणि समाजाला..’ : भाजपा महिला नेत्याचा राठोड यांच्यावर हल्लाबोल मुंबई : 'पूजा चव्हाणाचा हत्यारा संजय राठोड आहे आणि त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. बंजारा समाजाला समोर करून आपला बचाव करण्यासाठी हा केविलवाना प्रयत्न आहे. बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहोरादेवी अशा पवित्र ठिकाणी  संजय राठोड याने आपल्या पापाची कबुली दिली आहे' अशी टीका भाजपच्या नेत्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी केली.
'तुम्ही शेण खायचे आणि समाजाला वेठीस धरायचे, लाज तरी थोडी राहु द्या, ज्या ऑडिओ क्लिप समोर आल्या आहे. जे फोटो आले आहे, त्यावर कोणतेही स्पष्टीकरण दिले जात नाही' असंही वाघ म्हणाल्या.
पूजा चव्हाण प्रकरणी पुणे पोलिसांनी थातुरमातुर उत्तर दिले आहे. या प्रकरणात मुख्य संशयित संजय राठोड आहे. त्यांच्याबद्दल कोणतीही चौकशी केली जात नाही, त्यामुळे तो अहवाल आम्हाला मान्य नाही. आम्ही राज्यपाल आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार करणार आहोत, अशी माहितीही वाघ यांनी दिली.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेसPost a comment

0 Comments