भाजपच्या युवा महिला नेत्यास कोकेनसह अटक

भाजपच्या युवा महिला नेत्यास कोकेनसह अटक

 भाजपच्या युवा महिला नेत्यास कोकेनसह अटक 


कोलकाता : भाजपच्या युवा नेत्या आणि हुगळी जिल्ह्याचे सरचिटणीस पामेला गोस्वामीला पोलिसांनी कोकेनसह रंगेहाथ पकडले आहे. पामेला गोस्वामीला पोलिसांनी 100 ग्रॅम कोकेनसह अटक केली असून, तिच्यासोबतच तिचा सहकारी प्रबीर डे ला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.गोस्वामी कोकीन घेऊन आपल्या कारमधून जात असतानाच पोलिसांनी तिची गाडी थांबवत झडती घेतली. यावेळी तिच्या कारमध्ये कोकेन आढळले. या कोकेनची किंमत लाखो रुपये असल्याचे सांगितले जात आहे. पामेला मागील बऱ्याच काळापासून अमली पदार्थांच्या तस्करी संदर्भातील कामामध्येही सहभागी होती, असे सांगितले जाते.
पामेलाला अटक करण्यात आली त्यावेळी तिच्यासोबत केंद्रीय सुरक्षा दलात तैनात असलेला सैनिकही सुरक्षारक्षक म्हणून होता. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेसPost a comment

0 Comments