प्रशिक्षणच नसल्याने जिल्ह्यात अनेक शिक्षक वरिष्ठ व निवड श्रेणी पासून वंचित : सचिन नलवडे

प्रशिक्षणच नसल्याने जिल्ह्यात अनेक शिक्षक वरिष्ठ व निवड श्रेणी पासून वंचित : सचिन नलवडेप्रशिक्षणच नसल्याने  जिल्ह्यात अनेक शिक्षक वरिष्ठ व निवड श्रेणी पासून वंचित : सचिन नलवडे


म्हसवडअहमद मुल्ला : सातारा जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाने वरीष्ठ वेतनश्रेणी निवडश्रेणीसाठी आवश्यक असलेले प्रशिक्षणच घेतले नसल्याने त्यासाठी पात्र शिक्षकांना संबंधित वेतनश्रेणीपासुन वंचित रहावे लागत आहे. त्यासाठीचे शासनाकडून प्रशिक्षण तातडीने आयोजित करण्यात यावे अन्यथा हमीपत्रावर वरीष्ठ व निवडश्रेणी पात्र यादी घोषित करावी अशी मागणी सातारा  जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सचिन नलवडे यांनी केली आहे.
नोकरीमध्ये १२ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना वरीष्ठ वेतनश्रेणी  व २४ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना निवडश्रेणी मिळत असते पण त्यासाठी संबंधीत शिक्षकांना शासनाच्या शिक्षण विभागाने आयोजित केलेले प्रशिक्षण करणे अनिवार्य आहे. याबाबतदेखील अनेक जी.आर मुळे संभ्रमावस्था आहे.
गेल्या काही वर्षापासुन असे कोणतेच प्रशिक्षण शासनाच्या शिक्षण विभागाने आयोजित केले नाही. त्यामुळे यासाठी पात्र असूनही शिक्षकांना संबंधित प्रशिक्षण कधी होणार याकडे लक्ष ठेवुन बसावे लागत आहे.या संदर्भात बोलताना सचिन नलवडे म्हणाले की सातारा जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यांत वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रशिक्षण झाले नसले तरी संबंधीत पात्र शिक्षकांचे हमीपत्र घेऊन त्यांना त्या श्रेणी देण्यात आल्या आहेत. मग सातारा जिल्ह्यात मात्र असे हमीपत्र घेऊन पात्र शिक्षकांना वरिष्ठ व निवडश्रेणी दिली जात नाही. यामध्ये सातारा जिल्ह्यातील वरिष्ठ व निवडश्रेणी पात्र शिक्षकांवर अन्याय होत आहे.
याबाबत तत्कालीन शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांना मुख्याध्यापक संघटनेच्या माध्यमातून अनेकवेळा विचारणा केली पण त्यावर एकच उत्तर येत होते ते म्हणजे आम्ही मागदर्शन मागविले आहे. ज्या मार्गदर्शनाचे उत्तर गेली दोन वर्षे आले नाही.   

ज्या शिक्षकांची सेवांतर्गत प्रशिक्षण झालेले आहे त्यांची शिक्षणाधिकारी यांचे कार्यालयाने एकत्रित फक्त यादी घोषित करावी असे शासनाचे निर्देश असताना सदर बाबत एक एक फाईल शिक्षण विभागातून  का व कशासाठी काढली जाते याही प्रश्नाचे उत्तर गुलदस्त्यात आहे.सध्याचे शिक्षणाधिकारी श्री. खंदारे यांनी या प्रश्नाकडे गांर्भियाने घेवून  एकतर शासनाकडे याबाबत लवकरच आनलाईन प्रशिक्षण लावण्यासाठी प्रयत्न व्हावे, अन्यथा शेजारील जिल्ह्यासारखे हमीपत्रावर वरीष्ठ व निवडश्रेणी द्यावी याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी नलवडे यांनी केली आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस


Post a comment

0 Comments