शासकीय दरानुसारच एचआरसीटी चेस्ट तपासणीचे दर आकारणी करा ; जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

शासकीय दरानुसारच एचआरसीटी चेस्ट तपासणीचे दर आकारणी करा ; जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरीशासकीय दरानुसारच एचआरसीटी चेस्ट तपासणीचे दर आकारणी करा ; जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सांगली : कोविडच्या पार्श्वभूमीवर एचआरसीटी चेस्ट तपासणी दरावर नियंत्रण रहावे यासाठी राज्य शासनाने एचआरसीटी चेस्ट तपासणीचे दर निश्चित केले आहेत. शासकीय दरानुसारच डायग्नोस्टीक सेंटर्सनी दर आकारणी करावी, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या.


जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात रेडिओलॉजीस्ट यांच्या समवेत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, डायग्नोस्टीक सेंटर्सचे रेडिओलॉजीस्ट उपस्थित होते.


जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोविड रूग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिक विविध तपासण्या करण्यासाठी डायग्नोस्टीक सेंटर्सवर येत आहेत. यावेळी प्रामुख्याने एचआरसीटी चेस्ट तपासणी करण्यात येते. अशावेळी कोरोना पॉझीटीव्ह असल्याचे निष्पन्न होते. यावेळी डायग्नोस्टीक सेंटर्स प्रशासनाने तातडीने आरोग्य विभागाला कळविणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ई-मेल आयडी उपलब्ध करून दिला आहे. त्यावर संबंधित माहिती तातडीने सादर करावी.


कोरोना पॉझीटीव्ह येणाऱ्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसींगच्या दृष्टीकोनातून सविस्तर माहिती प्रशासनास सादर करावी. प्रामुख्याने कोरोना बाधितांचा मोबाईल क्रमांक देण्यात यावा. त्याचबरोबर संबंधित रूग्णांच्या नातेवाईकांना कोरोनाची चाचणी घेण्याबाबत तातडीने मार्गदर्शन करावे, असे सांगून डायग्नोस्टीक सेंटर्सनी चाचण्याबाबतचे दर दर्शनी भागात लावावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

Join Free Telegram माणदेश एक्सप्रेस 


Post a comment

0 Comments