आमदार गोपीचंद पडळकर व धनगर समाजाची सोशल मीडियातून बदनामी : बारामतीत तक्रार दाखल

आमदार गोपीचंद पडळकर व धनगर समाजाची सोशल मीडियातून बदनामी : बारामतीत तक्रार दाखलआमदार गोपीचंद पडळकर व धनगर समाजाची सोशल मीडियातून बदनामी : बारामतीत तक्रार दाखल


बारामती : भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर Gopicand Padalkr यांच्या विरोधात सोशल मिडियातून बदनामीकारक मजकूर लिहून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी बारामती शहर पोलीसत तक्रार दाखल करण्यात आली आहे.


शशांक मराठे याने  (प्लॉट नंबर 28 टी/7 व अंगणवाडी रोड 12 गोवंडी रोड, शिवाजीनगर मुंबई महाराष्ट्र) याने शशा मराठे या फेसबुक अकाउंट वरून धनगर समाजाची व आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरती अश्लिल भाषेत लिखाण केले आहे. त्यामुळे धनगर समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. 


याबाबत डॉ. अर्चना पाटील यांनी तक्रार दिली असून या तक्रारीवर बापुराव सोलनकर, संपतराव टकले, सुधाकर पांढरे, वसंत घुले, नवनाथ मलगुंडे यांच्या सह्या आहेत.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस 


Post a comment

0 Comments