पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याने लिंगाप्पा सरगर यांचा लोकनेते किसनराव कोळेकर पतसंस्थेकडून सत्कार

पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याने लिंगाप्पा सरगर यांचा लोकनेते किसनराव कोळेकर पतसंस्थेकडून सत्कारपोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याने लिंगाप्पा सरगर यांचा लोकनेते किसनराव कोळेकर पतसंस्थेकडून सत्कार 


कोळा : कोळा ता. सांगोला येथील लोकनेते किसनराव कोळेकर अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटीत कोळा गावचे सुपुत्र लिंगाप्पा सरगर यांची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल जि.प. सदस्य अॅड. सचिन देशमुख यांच्या हस्ते शाल फेटा श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी अॅड.सचिन देशमुख यांनी लिंगाप्पा सरगर यांनी हलीखीच्या परीस्थितीमधुन जिद्द व चिकाटीच्या जोरावर विद्यार्थी ते राष्ट्रीय खेळाडु ते पोलिस कॉन्स्टेबल पदावरुन पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत कशाप्रकारे यश मिळवले हे सांगुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


यावेळी युवक नेते मारुती सरगर, उद्योगपती अरविंद देशमुख, रखमाजी कोळेकर, संस्थेचे चेअरमन दादासाहेब कोळेकर, व्हा.चेअरमन राजाराम आलदर, संचालक सोपान कोळेकर, श्रीमंत सरगर,संभाजी गोडसे, संदिप पाटील, विशाल मोरे, ज्ञानु लोहार, गणेश नकाते, नाना आलदर, दिपक बोधगीरे, विक्रम माने आदि उपस्थित होते.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस 


Post a comment

0 Comments