Lockdown : राज्यात उद्या रात्री ८ पासून कडक निर्बंध, १५ दिवस संचारबंदी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

Lockdown : राज्यात उद्या रात्री ८ पासून कडक निर्बंध, १५ दिवस संचारबंदी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणाLockdown : राज्यात उद्या रात्री ८ पासून कडक निर्बंध, १५ दिवस संचारबंदी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा


मुंबई : राज्यामध्ये पुढील १५ दिवसासाठी उद्या रात्री ८ पासून कलम १४४ लागू क्र्नाय्त आले असून कडक निर्बंध  लावण्यात आली असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्यात कडक निर्बध लावण्यात आलेके आहेत. त्यामुळे, गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. सदरचे निर्बध हे 14 एप्रिल रोजी रात्री 8 पासून लागू करण्यात आले असून ते 1 मे पर्यंत लागू राहणार आहेत. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनेतशी फेसुबक सोशल मिडियाद्वारे माध्यमातून संवाद साधला. राज्यातील जनतेला सर्वप्रथम गुढी पाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या. त्यानंतर, राज्यातील कोरोना परिस्थितीची विदारक परिस्थिती कथन करत, लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. राज्यात कोरोना परिस्थितीचा सर्वाधिक भार वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर पडत आहे. आपण दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, पण आपल्याला कोरोनाच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हावेच लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या घोषणेनुसार, राज्यात 14 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.  


Join Free Telegram Group माणदेश एक्सप्रेस 


Post a comment

0 Comments